Jalgaon Dharangaon Boy death Case  saam tv
महाराष्ट्र

Boy Death case : नैसर्गिक मृत्यू की खून? अडीच महिन्यांनंतर गणेशचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर, गूढ उकलणार

jalgaon boy death case fresh postmortem investigation : १२ वर्षीय गणेशचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. क्रिकेट खेळताना मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र, गणेशचा खून झाल्याचा संशय वडिलांना होता. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं गूढ उलगडणार आहे.

Nandkumar Joshi

संजय महाजन, जळगाव, साम टीव्ही

जळगावमधील धरणगाव तालुक्यात रेल गावात १२ वर्षीय गणेश नवल पाटील याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला होता. मार्चमध्ये ही घटना घडली होती. पण त्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या वडिलांना होता. अखेर अडीच महिन्यांनंतर गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. अहवालातून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

१५ मार्चला अवघ्या १२ वर्षांच्या गणेश नवल पाटील याचा मृत्यू झाला होता. क्रिकेट खेळताना त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वडिलांचा यावर विश्वासच बसत नव्हता. आपल्या मुलाचा खून झाला आहे, असा संशय त्यांच्या मनात घर करून राहिला. आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून दीड महिन्यापेक्षा अधिक काळ त्यांनी पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. न्यायासाठी सगळी धावपळ सुरू होती.

अखेर अडीच महिन्यांनंतर गणेशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. जुन्या वादातून मित्राने छातीत बॅट मारून त्याची हत्या केल्याचा आरोप गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला. फॉरेन्सिक पथक, पोलीस, तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. अवशेष बघून वडिलांना रडू कोसळलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आला.

मुलाच्या मृत्यूबाबत वडील नवल बळीराम पाटील यांना संशय होता. त्यांच्या मागणीवरून आज मरणोत्तर पंचनामा करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्याच्या मेडिकल कॉलेजला पाठवला आहे.
महेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार, धरणगाव
१३ मार्च २०२६ रोजी लहान मुलं क्रिकेट खेळत होती. खेळताना गणेशला याला बॅट लागली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता. वडिलांना मृत्यूबाबत संशय असल्याने आज मुलाचा मृतदेह तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढला. मृत्यूचे नेमके काय कारण आहे हे शोधण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सुनील पवार, पोलीस निरीक्षक, धरणगाव
घटनेच्या काही दिवस आधी किरकोळ वाद झाला होता. या वादातून मुलाची बॅट घालून हत्या केल्याचा संशय होता. मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. रिपोर्टमधून नेमकं कारण समजेल. माझ्या मुलाचा घातपातच झाला आहे, असा दाट संशय आहे.
नवल पाटील, मयत मुलाचे वडील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT