ganesh Naik and Shahaji bapu patil saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी नाईकांनी पवारांना मदत केली होती; शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Shahaji patil big claim against ganesh naik : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी नाईक यांनी शरद पवारांना मदत केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

भरत नागणे

maharashtra politics shahaji bapu patil explosive statement : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. वर्तमान सरकारमधील वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार पाडण्यासाठी शरद पवार यांना मदत केली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी नाईक यांच्यावर टीकास्त्रही सोडलं.

गणेश नाईक हा कद्रु मनाचे अल्पसंतुष्ट माणूस आहे. हा माणूस भाजपचा निष्ठावंत नाही, असेही शहाजी बापू पाटील म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. शिंदेंचे नाव वगळल्याने माजी आमदार शहाजी बापू पाटील हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक दिवस गणेश नाईक हे नवी मुंबईच्या राजकारणातून गायब झालेले दिसतील, असेही ते म्हणाले.

हळूहळू संपूर्ण ठाकरे गट शिवसेनेत दिसेल

भाजप सरकार आणि एकनाथ शिंदेंवर नेहमीच टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावरही शहाजी बापू पाटील यांनी तोफ डागली. संजय राऊत यांनी मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काहीतरी कल्पना करणे आता सोडून द्यावे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जिथे तिथे एकनाथ शिंदे दिसत आहेत. फक्त खासदारच नाहीत, तर संपूर्ण ठाकरे गट हळूहळू शिवसेनेत आलेला दिसेल, असेही शहाजी बापू पाटील म्हणाले.

सोलापुरात महायुतीचे उमेदवार जिंकतील

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे ५५० इतक्या विक्रमी मतांनी विजयी झालेले दिसतील, असा विश्वासही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. मोहिते-पाटील घराणं राजकीयदृष्ट्या विरघळलेले आहे. त्यात काही दम राहिलेला नाही. कोणी नाराज असलं म्हणून राजकारणात विजय मिळत नसतो, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तहसीलदारांच्या पत्नीकडून सरकारी वाहनाचा गैरवापर

बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टर धडकली; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

Thalapathy Vijay Wife: थलापती विजय आणि संगीता होणार वेगळे? घटस्फोट प्रकरणावर आज सुनावणी

'या' देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे कोंबडा

Shocking : संतापजनक! बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, १९ वर्षाच्या तरुणांकडून ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

SCROLL FOR NEXT