Ganesh Murti Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Ganesh Murti Price Hike: गणेशभक्तांना महागाईचा फटका, यंदा गणेशमूर्ती २५ ते ३० टक्क्यांनी महागणार, नेमकं कारण काय?

Ganesh Murti Price Increase Reason: यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल २५ ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.

Manasvi Choudhary
  • महागाई, इंधन, कामगारांचा खर्च वाढल्याने होणार परिणाम

  • गणेश मूर्तीची किंमत वाढणार

यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडली असून, गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल २५ ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पाणीटंचाई आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्ती कारागिरानी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिक खर्च करावा लागणार असून, सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.

यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, सध्या राज्यभरातील मूर्ती कारखान्यांमध्ये रंगकाम आणि अंतिम सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (POP), शाडू माती, रंग, रसायने, ताडपत्री, प्लास्टिक कागद, आदी साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पीओपीच्या एका बॅगमागे सुमारे ५० रुपयांची वाढ झाली असून, पूर्वी २५० रुपयांना मिळणारे साहित्य आता ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे कच्चा माल कारखान्यांपर्यंत आणणे आणि तयार मूर्ती विविध शहरांमध्ये पोहोचवण्याचा खर्चही वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी पाणीटंचाईमुळे पाणी जपून वापरावे लागत आहे.त्याचबरोबर कुशल कारागिरांचे मानधनही वाढल्याने मूर्ती निर्मिती अधिक खर्चिक झाली आहे.

रंग, प्लास्टर, माती, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किंमती २० ते ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागल्या आहेत. तरीही आम्ही दर्जेदार व पर्यावरणपूरक मूर्ती कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेशभक्तांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

SCROLL FOR NEXT