Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे शरीराची पचनशक्ती मंदावते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
1) पावसाळ्यात नेहमी ताजे, गरम आणि नीट शिजवलेले अन्नच खावे. शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळावे, कारण त्यात बॅक्टेरिया लवकर वाढतात.
2) मूग डाळ, तांदळाची खिचडी, सूप आणि उकडलेल्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ पचायला हलके असतात.
3) जेवणात किंवा चहामध्ये आल्याचा आणि लसणाचा वापर वाढवा. हे नैसर्गिक अँटी-बॅक्टेरिअल आहेत.
4) रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे, ज्यामुळे घसा आणि छातीचे विकार दूर राहतात.
1) रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ पाणीपुरी, वडापाव, भेळ किंवा कापलेली फळे खाणे टाळा.
२) पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये कीड आणि माती जास्त असते, तसेच त्या लवकर कुजतात. जर खायच्या असतील, तर त्या कोमट मिठाच्या पाण्यात नीट धुवून, नीट शिजवूनच खाव्यात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.