पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा मटकीची कुरकुरीत भजी; एकदा खाल तर खातच राहाल

Manasvi Choudhary

मटकी

मटकीची भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. मटकीच्या भाजी घराघरात बनवली जाते.पण तुम्हाला मटकीपासून काही वेगळी रेसिपी बनवायची असेल तर तु्म्ही मटकीची कुरकुरीत भजी बनवू शकता.

Matki

मटकीची कुरकुरीत भजी

मटकीची कुरकुरीत भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Matkichi Kurkurit Bhaji

मटकीची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मटकीची भजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, हिरवी मिरची, लसूण, कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, धना पावडर, बेसन, मसाला, ओवा, बेसन , मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.

Matki | yandex

मटकी भिजत घाला

मटकीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात ३ ते ४ तास मटकी भिजत घाला. त्यानंतर मोड आलेली मटकी तयार होईल.

matki | yandex

बारीक पेस्ट तयार करा

मिक्सरच्या भांड्यात मोड आलेली मटकी, लसूण, हिरवी मिरची, जिरे याची बारीक पेस्ट करा.

Paste | Pintrest

मिश्रण एकजीव करा

नंतर एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढा. त्यात बेसन, हळद, धना पावडर, लाल मसाला, ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा मिक्स करा. चवीनुसार या संपूर्ण मिश्रणात मीठ मिक्स करा आणि मिश्रण चांगले एकजीव करा.

Bhaji Batter | GOOGLE

मटकीची भजी तयार

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये या मिश्रणाचे बारीक गोळे सोडा. मटकीची भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यत तळून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी मटकीची कुरकुरीत भजी तयार होईल.

Matkichi Kurkurit Bhaji

NEXT: मंगळसूत्र ब्रेसलेटच्या युनिक 5 डिझाईन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

येथे क्लिक करा...