आलं, तुळस आणि मिरीचा काढा; पावसाळ्यात आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर| Ayurvedic Kadha Recipe

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्यासाठी प्या काढा

पावसाळ्या निरोगी आरोग्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरगुती पद्धतीचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.

Ayurvedic Kadha Recipe

साहित्य

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आले, तुळशीची पाने, काळी मिरी, दालचिनी, मध हे एकत्र करा.

Ayurvedic Kadha Recipe

पाणी उकळून घ्या

सर्वातआधी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी चांगले उकळून घ्या नंतर त्यात आलं बारीक किसून मिक्स करा.

Boil water | yandex

मिश्रण मिक्स करा

नंतर या मिश्रणात स्वच्छ धुतलेली तुळशीची पाने, काळी मिरी आणि दालचिनी हे मिक्स करा. मिश्रण चांगले उकळून घ्या म्हणजे हे मसाले चांगेल मिक्स होतील.

Mix Ingedients

गूळ मिक्स करा

तुम्हाला जर काढा कडू वाटत असेल तर तुम्ही त्यात गुळाचा खडा मिक्स करू शकता. यामुळे काढाचा कडूपणा कमी होईल.

Mix Jaggery | yandex

आयुर्वेदिक काढा तयार

संपूर्ण मिश्रण चांगले उकळून घ्या. नंतर एका ग्लासमध्ये हे मिश्रण गाळून घ्या. घरच्या घरी आयुर्वेदिक काढा तयार होईल.

Ayurvedic Kadha Recipe

कधी प्यावा?

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी सकाळी व संध्याकाळी दोन वेळी गरमा गरम काढा तुम्ही पिऊ शकता.

Ayurvedic Kadha Recipe

NEXT: पावसाळ्यात नक्की खा 'या' ६ गावरान भाज्या; चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

येथे क्लिक करा..