Gadchiroli Bhamragad Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Gadchiroli Bhamragad Accident News : गडचिरोलीतील भामरागडमध्ये मालवाहू जीप आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत असून मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Alisha Khedekar

  • भामरागडमधील हिणबट्टी फाट्याजवळ जीप–बाईकची समोरासमोर धडक

  • अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

  • जखमींना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • पोलिसांचा तपास सुरु

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोलीतील भामरागडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाहेरी मार्गावरील मेडपल्ली ते हिणबट्टी मार्गावर हिणबट्टी फाट्याजवळ मालवाहू जीप व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड लाहेरी मार्गावरील मेडपल्ली ते हिणबट्टी मार्गावर हिणबट्टी फाट्याजवळ मालवाहू जीप व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृत तरुणांची नवे राजेश मुरा पुंगाटी, सन्नू गुरू गोटा अशी आहेत.

अपघातानंतर त्यांना तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भामरागड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताबाबतचा पुढील तपास सुरू आहे.तरुणांच्या अपघाती मृत्यूने परिसरात तणावाचे वातावरण असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तीन मुलांचे छत्र हरवले

सन्नू गोटा यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेश पुंगाटी हा अविवाहित होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT