Pune Crime  Saam tv
महाराष्ट्र

Shocking News: शाळेतच मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचं खुल्लम खुल्ला प्यार, लपून बघणाऱ्या विद्यार्थ्यांना चोपलं

Gadchiroli News: गडचिरोलीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका वर्गामध्येच विद्यार्थ्यांसमोर अश्लिल चाळे करत होते. या दोघांना ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं त्यांना त्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे गडचिरोलीमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक आणि शिक्षिकेने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला. कारवाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप लावलं. ही घटना समोर येताच या दोघांना देखील सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे वर्गातच खुल्लम खुल्ला प्यार सुरू होते. ज्या विद्यार्थ्यांनी या दोघांचे अश्लील चाळे पाहिले त्यांनाच दोघांनी फटकवलं. या घटनेमुळे गडचिरोलीमध्ये खळबळ उडाली. या घटनेवरून संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप लावले. शाळा व्यवस्थापन समितीने या दोघांच्या प्रेमप्रकरणाची दखल घेत दोघांनाही सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली.

मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात. हे त्यांनी पहिल्यांदाच नाही केले तर ते नेहमी वर्गात विद्यार्थ्यांसमोर असे कृत्य करायचे. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मनावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT