
ओडिशा राज्यातील मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा भागातील असलेल्या सरकारी निवासी शाळेत १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी वसतिगृहात राहते. या विद्यार्थिनीने उपविभागीय रुग्णालयात मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळालीय. विद्यार्थिनीने दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला.
हाती आलेल्या वृत्तानुसार, मुलगी आठ महिन्यांची गरोदर होती. त्याच अवस्थेत तिने शाळा आणि क्लासेस पूर्ण केले. अशाच अवस्थेत ती बोर्डाच्या पेपरला उपस्थित राहिली. दरम्यान तिच्या गरोदरपणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झालीय. वसतीगृहात राहणारी विद्यार्थिनी आठ महिन्यांची गरोदर राहते. ते कोणालाच कळत नाही. मुलीच्या घरच्यांना माहिती नसते. यावरून विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी प्रश्न केले जात आहेत.
मुलीच्या पालकांनी या घटनेसाठी शाळा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांनी या घटनेसाठी वसतिगृहाच्या वॉर्डनला जबाबदार धरले आहे. चित्रकोंडा पोलिसांनी तपास सुरू केलाय. जिल्हा कल्याण अधिकारी (DWO) यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. एसटी आणि एससी विकास, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक याप्रकरणी म्हणाले, "मुलींच्या वसतिगृहात पुरुषांना परवानगी नाही. ती गर्भवती कशी झाली हे आम्हाला माहित नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची साप्ताहिक तपासणी करणे अपेक्षित आहे.
या घटनेवरून हे दिसून येते की आरोग्य कर्मचारी तिचे काम करत नव्हते," असेही ते म्हणाले. मुलगी आणि बाळाला चित्रकोंडा येथील उपविभागीय रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर मलकानगिरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती होती. चित्रकोंडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदोष प्रधान यांनी सांगितले की, पॉक्सो कायदा आणि बीएनएसच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा प्रशासनाने महिला मॅट्रन सुचित्रा चर्चा यांना तत्काळ कार्यमुक्त केले आणि मुख्याध्यापक अजित कुमार मडकामी आणि सहायक नर्सिंग आणि मिडवाइफरी (ANM) कविता कुमारी यांना निलंबित करण्याचे माहिती एका अधिकाऱ्याने दिलीय. मुलीच्या पालकांनी शाळेच्या अधिकाऱ्यांकडून प्रसूतीपर्यंत गर्भधारणा कशी लपवून ठेवली याची माहिती घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.