Gadcharoli News Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli News: न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलीस निरीक्षकास अटक

Gadchiroli Police: 3 जून रोजी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली.

Shivani Tichkule

मंगेश भांडेकर

Gadchiroli News Today: आपल्या विरोधात निकाल दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकवल्या प्रकारी चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोठडी सुनावल्यानंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. (Latest Marathi News)

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान 20 एप्रिल रोजी पोलीस (Police) निरीक्षक राजेश खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी चामोर्शीत आंदोलन झाले. मात्र पोलीस निरीक्षकावर कारवाई झाली नाही.

त्यामुळे अतुल गण्यारपवार न्यायालयात गेले. चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी 20 मे रोजी कलम 294, 324, 326 नुसार राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राजेश खांडवे न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांना धमकवल्याचा प्रकार उघड झाला होता. (Gadcharoli News)

या प्रकरणी न्यायाधीश मेश्राम यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवगत करून गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा राजेश खांडवे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अखेर 3 जून रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नवीन जबाबदाऱ्या मिळतील! ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

SCROLL FOR NEXT