Vidhan Sabha Elelction Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Elelction : गडचिरोली विधानसभेतील १०८ कर्मचाऱ्यांना नोटीस; प्रशिक्षणाला गैरहजर

Gadchiroli News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणूक कार्यक्रमाकरिता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या १०८ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगुल वाजला असून या निवडणूक कार्यक्रमाकरिता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अगोदर प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार (Gadchiroli) गडचिरोलीत २६ आणि २७ ऑक्टोम्बरला मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. दरम्यान या प्रशिक्षणासाठी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील १ हजार ८१९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परंतु वेगवेगळी कारणे दाखवून नियुक्ती रद्द करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केला. तर प्रशिक्षणात अनधिकृतपणे १०८ कर्मचारी गैरहजर राहिले. प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तात्काळ खुलासा मागितलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT