- मंगेश भांडेकर
Gadchiroli News : गडचिरोलीत बुधवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील छत्तीसगड (chhattisgarh) सिमवेरील गावात नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची (tendu leaves) नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. तेंदूपानांचा भाव वाढवून देण्याची धमकीवजा मागणी नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून केली आहे. (Maharashtra News)
नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास मुरूमगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील छत्तीसगड सीमेवरील रिधवाही गावात जवपास वीस तेंदू पान फळींची जाळपोळ केली. याठिकाणी एक पत्रकदेखील आढळून आले आहे. उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी भाकपा (माओवादी) नावाने हे पत्रक काढण्यात आले आहे.
या पत्रकात तेंदू पानांना अकराशे रुपये प्रती गोणी भाव द्या अशी धमकी देण्यात आली आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम जोरात सुरू आहे. या माध्यमातून आदिवासींचे वर्षभराचे आर्थिक बजेट चालते.
यातून नक्षलवाद्यांना देखील मोठ्या प्रमाणात खंडणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी कमी भाव मिळाल्याने यंदा अनेक ठिकाणी तेंदू पानाची मजुरी घसरली असल्याचे चित्र. तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षल्यांना रसद मिळणे कठीण होऊन बसले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.