Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : नक्षलवाद्यांचा भारत बंद; छत्तीसगडमध्ये दोन प्रवासी बस पेटवल्या

Gadchiroli News : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रात्री उशिरा दोन खाजगी प्रवासी बसेस जाळले आहेत

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर

गडचिरोली : गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान (Gadchiroli) नक्षलवाद्यांकडून आज भारत बंदची घोषणा यापूर्वीच केली होती. मात्र नक्षलवाद्यांनी रात्रीच्या वेळी दोन प्रवासी बस पेटवून दिल्या आहेत.  (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रात्री उशिरा दोन खाजगी प्रवासी बसेस जाळले आहेत. या अगोदर हिदूर- दोबुर- पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकण्यात आले होते. यानंतर गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज (Naxalites) नक्षलवाद्यांचा भारत बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवाशांना उतरवून बस जाळल्या 

बिजापूरहून बारसागुडाकडे जाणारी बस तिंबापूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी थांबवून त्यातील प्रवाशांना उतरवलं आणि ती बस जाळली. त्यानंतर काही किलोमीटर अंतरावर दुसरी बसही नक्षलवाद्यांनी जाळली. रात्री उशीरा ही घटना झाल्याने पोलीस आज सकाळी घटनास्थळी पोहचले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT