Gadchiroli News: धक्कादायक! आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, गडचिरोलीतील घटना

Gadchiroli News in Marathi: गडचिरोलीतून धक्कादाक वृत्त हाती आलं आहे. गडचिरोलीतील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
Hospital/file Photos
Hospital/file PhotosSaam tv
Published On

मंगेश भांडेकर, गडचिरोली

Gadchiroli Latest News:

गडचिरोलीतून धक्कादाक वृत्त हाती आलं आहे. गडचिरोलीतील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest marathi News)

नेमकं काय घडलं?

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. आश्रमातील जवळपास ७३ विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी दुपारच्या सुमारास कोबी, भाजी, वरण, भात असे जेवण केलं. त्यानंतर काही विद्यार्थिनींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hospital/file Photos
Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; कोकणात JN.१ व्हेरिएंटचा आढळला पहिला रुग्ण

ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थिनींना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ७३ विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Hospital/file Photos
BMC News: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता नाल्यांमध्ये कचरा टाकणं पडेल महागात, BMC करू शकते कारवाई

नंदुरबारातही वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने बिघडली होती विद्यार्थ्यांची प्रकृती

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या धवल पाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

जेवणाच्या सुटीनंतर परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांनी चंद्रज्योत या वनस्पतीच्या बिया खाल्ल्या होत्या. त्यानंतर तेरा विद्यार्थ्यांची प्रकृती खराब झाल्याची घटना घडली होती. तसेच या विद्यार्थ्यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com