Gadchiroli News Saamtv
महाराष्ट्र

Gadchiroli News: सुरजागड लोहखाणीत मोठी दुर्घटना! उत्खनन करणारे वाहन कोसळले; अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

Surjagad Mining Project Accident: उत्खननाचे काम सुरू असताना नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाण उत्खनन करताना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असा तिघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोह प्रकल्पात काल (रविवारी 6 ऑगस्ट) संध्याकाळच्या ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. उत्खननाचे काम सुरू असताना नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर जोरदार कोसळला. त्यामुळे गाडीतील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये सोनल रामगीरवार या अभियंत्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे.

दरम्यान, हरियाणातील मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नसून दुर्घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मजुरांनी आणि तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Shraddha Kapoor Photos : चुराके दिल मेरा गोरिया चली, श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य

मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या कारवर भीषण हल्ला, ओबीसी मेळाव्याला जात असताना काचा फोडल्या

Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

Beed Rain : बीडमध्ये मुसळधार पाऊस, पोलिस स्टेशनमध्ये साचले गुडघाभर पाणी |VIDEO

SCROLL FOR NEXT