Gadchiroli St Bus Accident: Shivni River Bridge Bus Overturns, Passengers Injured Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

Gadchiroli-Chamorshi Road Accident: गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर एसटी बस उलटल्याची घटना घडलीय. सुमारे 20 ते 25 प्रवासी जखमी असून 2 ते 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Bharat Jadhav

  • गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर एसटी बस उलटल्याची घटना घडली.

  • बसच्या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 2 ते 3 जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात झालाय. चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर बस उलटलीय.

या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर दोन्ही बाजूंच्या अप्रोच रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते.

याच ठिकाणी पोटेगावकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटली.

जखमींना हात, पाय आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून सर्वांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT