Gadchiroli protest over water crisis saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : पिण्याचा पाणीप्रश्न नाकातोंडाशी आला; आक्रमक आंदोलक वैनगंगा नदीपात्रात उतरले

Chandrapur-Gadchiroli Water issue : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा पिण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. या ज्वलंत मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाला असून, गोसेखुर्द धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.

Nandkumar Joshi

पराग ढोबळे, नागपूर/गडचिरोली

जगात तिसरं महायुद्ध पेटलं तर ते पाण्यासाठी होणार असं म्हटलं जातं. पण सध्या महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा पिण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. हाच ज्वलंत मुद्दा काँग्रेसनं उचलून धरला आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आंदोलन केलं. गडचिरोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याच मुद्यावर काँग्रेस आक्रमक झाला आहे. गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्यात यावं, या मागणीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. नाकातोंडाशी आलेला पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी आंदोलक वैनगंगा नदीपात्रात उतरले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गावकरी आक्रमक

गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचण होत आहे. नदीकाठावरील गावांतील भूजल पातळी सुद्धा घटली आहे. त्याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

काय आहेत मागण्या?

गडचिरोलीत होणाऱ्या विमानतळासाठी सुपिक जमिनी अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.

भेंडाळा त. चामोर्शी परिसरातील एमआयडीसीसाठी प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्यासाठी सरकारने अवलंबलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहित करू नये.

कोटगल बॅरेजकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा आणि जी शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अशा शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.

वडसा गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइन प्रकल्पाकरिता अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमीन मालक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT