Gadchiroli Food Poisoning News:  Saamtv
महाराष्ट्र

Gadchiroli Food Poisoning: बारशाचं जेवण महागात पडलं! ५ चिमुकल्यांसह २८ जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Gadchiroli Food Poisoning News: प्रथमोपचार केल्यानंतर 22 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे.

Gangappa Pujari

मंगेश भांडेकर, गडचिरोली, ता. ५ जुलै २०२४

बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने 2८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील राेपीनगट्टा गावात उघडकीस आली आहे. यामध्ये पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत राेपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम 4 जुलैला आयोजित केला हाेता. यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास सामीश जेवणाचा बेत आखला होता.

मात्र, पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना 15 मिनिटांतच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला, दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व 18 जणांना पेंढरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले.

तेथे प्रथमोपचार केल्यानंतर 22 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT