Gadchirroli News Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli : गडचिरोलीत सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई, ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchirroli News : गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील अबुझमाड परिसरात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • अबुझमाडमध्ये तीन दिवस चाललेली संयुक्त मोहीम यशस्वी

  • सात नक्षलवादी ठार

  • एक जवान शहीद, एक जवान जखमी

  • मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेडसीचा प्रभारी प्रभाकर उर्फ रवी उर्फ स्वामी याचाही समावेश आहे. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून एक जखमी झाला आहे.

गडचिरोली – नारायणपूर सीमेलगत अबुझमाड परिसरात तीन दिवस चाललेल्या संयुक्त मोहिमेत सी-६० कमांडो आणि सीआरपीएफ जवानांनी ही मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या अभियानात ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रभाकर उर्फ रवी उर्फ स्वामी, पागु मोडम, अनिला उर्फ बुदरी कोवाची, कामेश पदा, भजनाथ उर्फ भिमा होळी, मंगली कुरसाम आणि जोगी सोढी-मडावी यांचा समावेश आहे.

या सर्व नक्षलवाद्यांवर मिळून शासनाने ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी तीन एके-४७ रायफल, एक एसएलआर, एक .३०३ रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या चकमकीत पोलीस जवान दीपक चिन्ना मडावी यांनी शौर्याने लढताना वीरमरण पत्करले, तर जवान जोगा मडावी जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT