11th Admission Saam Tv News
महाराष्ट्र

11th Admission: अखेर अकरावीच्या अ‍ॅडमिशनला सुरुवात, पसंतीचे १० कॉलेज निवडा, जाणून घ्या प्रोसेस

11th FYJC Admission Process Starts: अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन आजपासून फॉर्म भरु शकतात.

Siddhi Hande

अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीसाठी आज सोमवार पासून नव्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.धुळे जिल्ह्यात एकूण २७ जागा आहेत. शासनाच्या आदेशानुसार यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होते आहेय त्यासाठी 16 मेपर्यंत महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया झाली. तसेच 19 व 20 मे रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन - शिबिर झाले.

21 मे पासून प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार होती पण तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित केली होती. ही प्रक्रिया आज सोमवारपासून पुन्हा सुरू होईल. त्यानुसार आता 26 मे ते 3 जून दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी व आवडीच्या महाविद्यालयाची पसंती यादी देता येणार आहे. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांनी आजपासून अर्ज करावेत. https://mahafyjcadmissions.in/ या वेबसाइटवर जाऊ तुम्हाला अर्ज करायचा आहे. (11th Admission Website)

अकरावीच्या २० लाख ९२ हजार जागांसाठी ही नोंदणी प्रक्रिया होणार आहे.राज्यातील नऊ हजार ३७३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नोंदणी करता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘कॅप’ फेरीसाठी १८ लाख ७७ हजार ८३९ जागा, तर विविध कोट्यांतर्गत दोन लाख १४ हजार ५११ जागा उपलब्ध आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाला आहे.

या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in/उपलब्ध आहे. याच वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT