Ambajogai Police  विनोद जिरे
महाराष्ट्र

अंबाजोगाईमध्ये दारूसाठी मित्राची हत्या; कारवाईच्या भीतीने एकाने केली आत्महत्या

पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

विनोद जिरे

बीड: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात दारू देण्यास टाळाटाळ केल्याने, दोघा मित्रांनी एका मित्राचा खून केला आहे. तर आता पोलीस कारवाई होईल, या भीतीने त्या दोघांपैकी एकाने आत्महत्या (self-slaughter) केली आहे. ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना पोलीस (Police) तपासात उघडकीस आली आहे. बीडच्या (Beed ) अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील गडदेवादीमध्ये, गेल्या 10 मार्च रोजी 45 वर्षीय बाबुराव विठ्ठल गडदे रा. चिचखंडी, ता.अंबाजोगाई यांचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई ग्रामीण (Rural) पोलिसांना यश आले आहे.

हे देखील पहा-

दारूच्या नशेत दोघा मित्रांनी तिसऱ्याचा खून केला आहे. यानंतर आता पोलीस (Police) कारवाई होणार, या भीतीने एका आरोपीने गळफास घेतला तर दुसऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, बाबुराव विठ्ठल गडदे हे 9 मार्च रोजी सकाळी घरातून निघून गेले आणि परत आले नाहीत. अशी तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर 10 मार्च रोजी दुपारी बाबुराव गडदे यांचा मृतदेह गडदेवाडी शिवारात ओढ्याच्या पात्रात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात (hospital) पाठवून दिला होता.

दरम्यान सदरील खून गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली. तपासाअंती आरोपी रामचंद्र गडदे आणि महादेव गडदे या दोघांनी हा खून केल्याच्या निष्पन्न झाले होते. तात्काळ पोलिसांनी 3 पथके तैनात करून त्या दोघांचा शोध सुरु केला. त्यातील एक पथक गडदेवाडी गावातच ठाण मांडून होते तर इतर दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीच्या शोधात होते. यादरम्यान यातील एक आरोपी महादेव गडदे याने 12 मार्च रोजी पोलीस कारवाईच्या भीतीपोटी गडदेवाडी येथे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे हा ऊसतोडीसाठी म्हणून फरार होता. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

असा झाला खुनाचा उलगडा

सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रामचंद्र गडदे याला, खाकीचा दणका दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. बाबुराव गडदे , महादेव गडदे आणि रामचंद्र गडदे हे तिघे मित्र 9 मार्च रोजी दारू पिण्यास बसले होते. यावेळी सुरुवातीला त्यांनी महादेव गडदे याच्या जवळील दारू पिली. त्यानंतर महादेव आणि रामचंद्र हे बाबुरावला त्याच्या जवळील दारू पिण्यासाठी बाहेर काढ म्हणून मागे लागले होते. परंतु, त्यासाठी बाबुराव टाळाटाळ करत होता. त्यामुळे चिडून त्या दोघांनी बाबूरावच्याच गळ्यात असलेल्या गमज्याने त्याचा गळा आवळला. त्यानंतर बाबुरावला ओढ्यात टाकून डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला असे रामचंद्रने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान रामचंद्र गडदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

SCROLL FOR NEXT