akola, railway gate saam tv
महाराष्ट्र

Akola News: रेल्वेचे कपलिंग तुटले...२८ डब्बे झाले वेगळे; अकाेल्यात मोठा अपघात टळला

गुढी पाडव्याच्या दिवशी घटना घडल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आल्याने वाहतुकीचा खाेळंबा झाला.

जयेश गावंडे

Akola Railway Station : अकोला (akola latest news) रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या न्यू तापडियानगर रेल्वे गेटजवळ भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या माल गाडीचा कप्लर तुटला. त्यामुळे अर्धी माल गाडी पुढे गेली आणि अर्धी जागेवरच थांबली. या घटनेनंतर रेल्वेच्या अधिका-यांनी तात्काळ पथक पाठवून उपाययाेजनेस प्रारंभ केला.

यामुळे रेल्वे वाहतुकीचा तब्बल एक तास खोळंबा झाला होता. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या न्यू तापडियानगर रेल्वे फाटकाजवळच मालगाडीचे डब्बे वेगळे झाल्याने फाटक तासभर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अकोट, दर्यापूरकडे जाणारी रस्ता वाहतुकही खोळंबली होती. (Breaking Marathi News)

सुमारे 110 डब्यांची ही मालगाडी बडनेरा (badnera) येथून भुसावळच्या (bhusawal) दिशेने निघाली हाेती. या मालगाडीत दगडी कोळसा आहे. दोन्ही डब्यांना जोडणारा भाग कप्लर तुटल्याने अर्धी गाडी काही अंतरावर राहिली तर उर्वरित गाडी इंजिन सोबत भुसावळच्या दिशेने निघून गेली.

त्यामुळे गाडीपासून २८ डब्बे वेगळे झाले. एअर ब्रेक असल्यामुळे वेगळे झालेले डब्बे जाग्यावरच थांबल्याने मोठा अपघात टळला. कपलिंग तुटून डब्बे वेगळे झाल्याची बाब गाडीचे गार्ड रज्जाक यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकासोबत संपर्क साधला.

डबल रेक गाडी असल्याने उर्वरित डब्ब्यांसह गाडीचे इंजन रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. गाडी थांबवून डब्बे जोडण्यासाठी रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी १२.१७ मिनिटांनी मालगाडी मागे आणून तुटलेले कपलिंग जोडण्यात आले.

त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. या दरम्यान भुसावळकडून बडनेरा व बडनेराकडून भुसावळकडे जाणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. याच वेळात गितांजली एक्स्प्रेस (geetanjali express) अकोला रेल्वे स्थानकावरून जाते. त्यामुळे या गाडीलाही विलंब झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणताही मोठा अपघात घडला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वःस घेतला.

तांत्रिक कारणामुळे तुटले कपलिंग

अकोला रेल्वे स्थानकाजवळ डबल रेक असलेल्या ११० डब्ब्यांच्या रेल्वे मालगाडीचे २८ डब्बे तुटून वेगळे झाले होते. मालगीडीच्या गार्डकडील भागातील २७२३२ क्रमांकाच्या डब्बाचे कपलिंग तुटून ६३९१० क्रमांकाचा डब्ब्यापासून वेगळे झाले.

मालगीडीच्या गार्डकडील भागातील डब्ब्याचे कपलिंग लुज झाल्यामुळे व ११० डब्ब्यांचा भार रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या चढावर वाढल्याने कपलिंग तुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात अकोला रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. गाडीचे कपलिंग जोडून दुरुस्तीसाठी अकोला रेल्वे स्थानकावर गाडी थांबविण्यात आली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT