Jalgaon Train Accident saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मालगाडीचे डबे रूळावरून घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प, कोणकोणत्या ट्रेन रद्द?

Freight Train Derails Near Amalner in Jalgaon: जळगावमधील अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रूळावरून घसरले. या मालगाडीमध्ये असलेला कोळसा रूळावर पडला. त्याचसोबत रेल्वे रूळाचे मोठे नुकसान झाले. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

Priya More

जळगावच्या अमळनेर येथे आज मोठी रेल्वे दुर्घटना घडली. सूरत- भुसावळ रेल्वे लाईनवरील अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रूळावरून घसरली. मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरल्यामुळे दोन्ही बाजूचे रेल्वे रूळ उखडले गेले. त्यामुळे या मार्गावरून रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. सध्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातामुळे अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळवरून नंदुरबारकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. त्यामुळे दोन्ही बाजूचे रूळ उखडून निघाले. मालगाडीचे डबे रेल्वे रूळावर पडले. या मालगाडीमध्ये कोसळा होता तो रूळावर पडला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे रेल्वे रूळाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

या अपघातामुळे आजूबाजूच्या रेल्वे रूळाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मालगाडीमध्ये कोळसा होता तो कोसळा रेल्वे रूळावर पडला आहे. मालगाडीचे एकूण सात डबे रुळावरून घसरले. नंदुरबार आणि जळगाव येथून डबे बाजूला करण्यासाठी तसेच त्यातील कोळसा इतर ठिकाणी भरण्यासाठी क्रेन मशीन मागवण्यात आल्या असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली. पुढील चार ते पाच तासांत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

पूर्णपणे रद्द केलेल्या ट्रेन:

ट्रेन क्रमांक १९००७ सुरत - भुसावळ एक्सप्रेस जेसीओ १५.०५.२०२५

ट्रेन क्रमांक १९००८ भुसावळ - सुरत एक्सप्रेस जेसीओ १६.०५.२०२५

शॉर्ट टर्मिनेशन ट्रेन:

ट्रेन क्रमांक ५९०७५ नंदुरबार - भुसावळ स्पेशल जेसीओ १५.०५.२०२५ दोंडाईचा येथे कमी वेळासाठी थांबेल आणि दोंडाईचा आणि भुसावळ दरम्यान रद्द केली जाईल.

ट्रेन क्रमांक १९१०५ उधना - भुसावळ स्पेशल जेसीओ १५.०५.२०२५ नंदुरबार येथे कमी वेळासाठी थांबेल.

ट्रेन क्रमांक १९१०६ भुसावळ - उधना स्पेशल जेसीओ १५.०५.२०२५ नंदुरबार येथे कमी वेळासाठी थांबेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT