Yavatmal School Saam Tv
महाराष्ट्र

स्पर्धा परिक्षेची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना दिले मोफत धडे; आमचीशाळा तरुणांचा अभिनव ऊपक्रम

विध्यार्थी स्काॅलरशिप साठी पात्र ठरतिल त्यांची गुणवंत्ता वाढेल, हा विचार घेवून आमचीशाळा हा प्रयोग करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक प्रस्थितीत अंत्यत बिकट असते.त्यामुळे ते शहराच्या ठिकाणी जाऊन कोचिंग क्लासेस लावू शकत नाही,परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षा पासून दुरच राहतो. मात्र गावखेड्यातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत भाग घेता यावा या हेतूने लोनबेहळ येथील काही जागृत युवक एकत्र येऊन २३ शिक्षकांना परिसरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिक्षेत गावखेड्यातील विद्यार्थ्यांना भाग घेता यावा यासाठी मोफत शिकवणीवर्गा व्दारे धडे द्यावं अशी विनंती केली. शिकक्षकांनी देखील गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत ४६ दिवसापासून मोफत मध्ये शिकवणीवर्ग सुरू केले आहे.

गावखेड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तोंड ओळख होऊन त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लोनबेहळ येथे २३ शिक्षक गेल्या ४६ दिवसापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षा करिता धडे देत आहे. ग्रामिण भागातिल विद्यार्थी शहरात जावून कोचिंग क्लास लावू शकत नाही. त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत कोचिंग क्लासेस उपलब्ध करून देण्यात आले, तर याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल.ते स्काॅलरशिप साठी पात्र ठरतिल, त्यांची गुणवंत्ता वाढेल, हा विचार घेवून आमचीशाळा हा प्रयोग करण्यात आला.

हे देखील पाहा -

राष्ट्रीय दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांन साठी शासनाकडून (एन. एम. एम. एस.)ही स्कॉलरशिप परिक्षा घेतली जाते, ती परिक्षा आठवी पास झालेले विद्यार्थी देवू शकतात.या परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना गावातील शाळेतच ऊन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसात तालुक्यातील शिक्षकांच्या मदतीने,आमचीशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आल्याने ४२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्हा परिषद शाळा लोणबेहळ, येथे हा उपक्रम मागिल ४६ दिवसांपासुन अविरत सुरू आहे.

विद्यार्थ्यांना मागिल तीन मे पासून लोणबेहळ येथे मोफत मार्गदर्शन दिले जात आहे.परिक्षेच्या दृष्टीने विविध विषयाचे मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे.यात विविध विषयांवरील सराव पेपर देखील सोडवून घेतले जात आहे.यामुळे परिक्षेच्या दृष्टीने सराव चांगला होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवंत्ता वाढणार आहे.गावातच मार्गदर्शन लाभल्याने विद्यार्थ्यांना आर्थीक फटका बसला नाही,वेळ वाचला आहे, स्पर्धा परीक्षेची तोंडओळख होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rautwadi Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतोय 'राऊतवाडी धबधबा', निसर्ग सौंदर्यात हरवून जाल

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

Metro In Dino Collection : सारा अली खानचा 'मेट्रो इन दिनों' फ्लॉप की हिट? चौथ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Nandurbar Tourism : नंदुरबारचा १२ दिशांतून कोसळणारा बारामुखी धबधबा तुम्ही पाहिला का?

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

SCROLL FOR NEXT