परभणी - बनावट आदेशा घेऊन रुजू होण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील शीर्ष तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर (School) आलेल्या आणखी एक बोगस शिक्षकाला कारवाईची चाहूल लागताच पळ काढावा लागला. आठ दिवसापूर्वी सोनपेठ तालुक्यातील उखळी जिल्हा परिषदेवर बोगस महिला रुजू होण्यासाठी आली होती या महीलेनेही असाच शाळेतून पळ काढला होता.
हे देखील पहा -
TET घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे यांच्या स्वाक्षरीनिशी 11ऑक्टोबर 2021 या तारखेत 12 उमेदवारांना शिक्षणसेवकपदी रुजू करून घेण्यासंदर्भात परभणीच्या शिक्षणाधिकार्याचा आदेश बोगस असल्याचे समोर आले होते. यातील मनीषा रामराव सुबरे ही महिला सोनपेठ तालुक्यातील उखळी येथील जिल्हा परिषद शाळेवर 15फेब्रुवारी रोजी रुजू होण्यासाठी आली असता सदरील महिलेकडे सीइओ शिवानंद टाकसाळे यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र आढळून आले होते. पण ही चाहूल लागल्यानंतर महिलेने शाळेतून पळ काढला.
तर तुकाराम सुपे यांच्या स्वाक्षरी यादीतील एक उमेदवार सचिन रावसाहेब गोंदकर हा देखील दोन दिवसापूर्वी सोनपेठ तालुक्यातील शीर्ष तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर रुजू होण्यासाठी आला असता त्याला मुख्याध्यापकाने केंदीय मुख्याध्यापकांकडे पाठवले. त्याने मुख्याध्यापकांकडे न जाता शाळेतून पळ काढला.
दरम्यान महिला मनीषा सुबरे व गोंदकर यांच्यात चर्चा झाली असावी या दोन्ही प्रकरणात परभणीच्या सीईओने दखल घेत पोलीस अधीक्षकांना संबंधित बोगस शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले असून पोलिसांनी अद्याप पर्यत गुन्हा दाखल केला नाही. या दोन्ही प्रकरणामुळे बोगस शिक्षकाचे धाबे दनालले असून पुढे काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.