Jalna: गटविकास अधिकाऱ्यांसह ६ ग्रामसेवक आणि ७ माजी सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा  लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

Jalna: गटविकास अधिकाऱ्यांसह ६ ग्रामसेवक आणि ७ माजी सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: जिल्ह्यातील टेंभुर्णी (Tembhurni) गावातील महसूल विभागाच्या ३२८ एकर जमिनीवर अतिक्रमण (Encroachment) प्रकरणी हायकोर्टाच्या (High Court) आदेशावरून गटविकास अधिकाऱ्यांसह ६ ग्रामसेवक ७ माजी सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा टेंभुर्णी पोलिस (Police) ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी गावातील (village) महसूल विभागाच्या ३२८ एकर जमिनीवर ६०१ जणांनी अतिक्रमण करण्यात आले होते. २०१३ मध्ये हे अतिक्रमण हटवण्याचा ठराव घेण्यात आला होता. (Fraud case against 6 Gram Sevak and 7 former Sarpanch)

हे देखील पहा-

मात्र ग्रामसेवक (Gramsevak) आणि सरपंचांनी अतिक्रमण न हटवल्याने या बाबत फकिरचंद खांडेकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्तांनी या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक उपअधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून या बाबद २०१८ मध्ये लोकायुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात तत्कालीन गायविकास अधिकारी, ६,ग्रामसेवक, ७ सरपंच यांनी बेकायदेशीररीत्या फेरफार घेऊन, ना हरकत प्रमाणपत्र देऊन,खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचे समोर आले होते.

यावरून लोकायुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र कारवाई होत नसल्याने याचिका कर्त्यांकडून औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाच्या उच्च न्यायालयात (court) याप्रकरणी धाव घेण्यात आली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणी गटविकास अधिकारी यांच्यासह ६, ग्रामसेवक ७, सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केले जात आहे. बेकायदेशीररीत्या फेरफार घेऊन, ना हरकत प्रमाणपत्र देऊन, खरेदी- विक्रीचा व्यवहार केल्याचे समोर आल्याने तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयात ही या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT