Beed : वक्फ बोर्डची 405 एकर जमीन हडपल्या प्रकरणी चौथा गुन्हा दाखल 
महाराष्ट्र

Beed : वक्फ बोर्डची 405 एकर जमीन हडपल्या प्रकरणी चौथा गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डची जमीन हडपल्या प्रकरणी 4 था गुन्हा दाखल जाला असून या प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात (Beed) वक्फ बोर्डची जमीन हडपल्या प्रकरणी, आष्टी तालुक्यात 3 गुन्हे दाखल झाले असतांना आता चौथा गुन्हा देखील दाखल झाला आहे. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली देवस्थानाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दर्ग्याची तब्बल 405 एकर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली असून पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले आहे.

जिल्हा वक्क बोर्ड (District Waqf Board) अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून, मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, (Muslim Religious Place Darga) जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह, 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह भुमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) आघाव याने मदतमास करून खालसा केली. शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची 796 एक्कर 37 गुंठे जमीनी पैकी 405 एक्कर 5 गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय. भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमीनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल 15 कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटलंय.

हे देखील पहा -

दरम्यान या गुन्ह्यात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याच्यासह हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, रा.ह मु सिडको एन 12 प्लट नं.14 औरंगाबाद सिडको, औरंगाबाद, रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी , सलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी शफाक गाँस शेख अजमतुल्ला पि. रजाउल्ला सय्यद रा.झमझम कॉलनी, बीड, अजीज उस्मान कुरेशी, मुजाहिद पि. मुजीब शेख मामला मोमीनपुरा,महसुल साहय्यक खोड, महसुल साहय्यक मडंलीक, मंडळ अधिकारी पी.के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे, पी एस.आंधळे तत्कालीन तहसिलदार व अभिलेख विभागातील महसुल अधिकारी या 15 जनांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT