चंद्रपुरात पु्न्हा दारुबंदी? मुंबई हायकोर्टात चार याचिका दाखल Saam TV
महाराष्ट्र

चंद्रपुरात पु्न्हा दारुबंदी? मुंबई हायकोर्टात चार याचिका दाखल

त्यामुळे चंद्रपूरमधील उठलेली दारुबंदी पुन्हा लागणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सुरज सावंत

मुंबई : चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) आव्हान देण्यात आले आहे. त्यासंबंधी चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकांवर मुंबईतील खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते की नागपूर खंडपीठासमोर, याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता प्रशासकीय पातळीवर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे चंद्रपूरमधील उठलेली दारुबंदी पुन्हा लागणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मोठ्या लढ्यानंतर चंद्रपूरमध्ये (Chandrapur) महिलांनी दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद उमटले होते. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने (Maharashtra Government) उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसह महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी 6 वर्षांनी उठवली होती. त्याचा असीम आनंद व्यावसायिकांना झाला होता आणि त्या संबंधीचा एका व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. दारुबंदी उठविणाऱ्या पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली जात असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT