accident, latur, udgir, haipatpur pati saam tv
महाराष्ट्र

Accident News : उदगीर - लातूर बसचा भीषण अपघात; कार चक्काचूर, पाच ठार, मदत कार्य सुरु

अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

दीपक क्षीरसागर

Accident : लातूर जिल्ह्यातील उदगीर लातूर रस्त्यावरील हैबतपुर पाटी नजीक आज एका चार चाकीचा आणि एसटीचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी (injured) झाल्याचे देखील समजते. (Breaking Marathi News)

राज्य परिवहन महामंडळाची उदगीरहून लातूरला जाणा-या बसचा आणि एका चार चाकीचा हैबतपूर पाटी जवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण हाेता की बसचं पुढचे चाक निखळले तर चार चाकीचा पुढचा भागाचा संपुर्णत: चेंदामेंदा झाला आहे. (Latur Accident News)

या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिका धाव घेतली. तसेच पाेलीस देखील पाेहचले. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमाेउपचार दिले. दरम्यान या अपघातात अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर,उदगीर) , अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोळा), कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरणाळी ता. मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) , नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह मु गोपाळ नगर, उदगीर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. (Maharashtra News)

या अपघातात बसमधील दहा जण जखम झाले आहेत. या अपघातामधील जखमींना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त चार चाकीमधील प्रवासी हे तुळजापूर येथून देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT