bakriid, solapur saam tv
महाराष्ट्र

Bakri Eid 2022 : चर्चा तर हाेणारच ! बक-याच्या कपाळावर अर्धचंद्रकोर; बाजारात खाताेय भाव (व्हिडिओ पाहा)

आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दाेन्ही सण येत्या रविवारी आलेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : मुस्लिम धर्मातील पवित्र सण म्हणून बकरी ईद (Bakri Eid) साजरा केला जातो. या सणामध्ये (festival) बकऱ्याच्या कुर्बानीला अनन्यसाधारण महत्व आहे. या निमित्त सोलापूरच्या (solapur) बाजारात बकरे खरेदी विक्रीच्या व्यवहाराला वेग आला आहे. (bakri eid latest marathi news)

यंदा आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) आणि बकरी ईद (bakri eid 2022) हे दाेन्ही सण रविवारी म्हणजेच एकाच दिवशी आले आहेत. एकादशी हिंदु धर्मात आणि बकरी ईद मुस्लिम धर्मात महत्वाची मानली जाते. या दाेन्ही सणांसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मंडईत रताळ्यांची माेठी आवक झाली आहे तर जनावारांच्या बाजारात बकरे दाखल झाले आहेत.

सोलापूरच्या बाजारात बकरे खरेदी विक्रीच्या व्यवहाराला वेग आला आहे. यामध्ये सोलापुरातील बाजारपेठेत आता तब्बल चार लाख रुपये किंमतीचा बकरा दाखल झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कडबळ गावच्या चंद्रकांत फुलारींच्या मालकीचा हा बकरा आहे. त्याला कपाळावर अर्धचंद्रकोर आहे. त्यामुळे फुलरींचा बकरा बाजारात चांगलाच भाव खाताना दिसून येतोय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT