Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशीसाठी पंढरी सज्ज; दर्शन रांगेत लाखाे भाविक उभे

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरातील प्रशासन साेयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे.
solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi saam tv

पंढरपूर / साेलापूर : येत्या रविवारी आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) आहे. या निमित्त लाखाे भाविक पंढरपूरातील (Pandharpur Wari News) विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल हाेऊ लागले आहे. एकादशी दिवशी विठ्ठलाच्या दर्शन व्हावे यासाठी भाविक तसेच वारकरी (Ashadhi Wari 2022) आत्ता पासूनच दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दरम्यान पंढरपूर यात्रेसाठी (pandharpur wari) पंढरी नगरी सज्ज झाली आहे.

पंढरपूर पालिका सज्ज

पंढरपूरमध्ये (Pandharpur News) आलेल्या वारकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची जबाबदारी पंढरपूर नगरपरिषदेची असते. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी म्हणाले पालिकेच्या वतीने वाखरी पालखी तळ, वाळवंट, दर्शन रांग याठिकाणी स्वच्छतागृहे उभारली आहेत. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे. आरोग्य सुविधा दिल्या आहेत. नदीपात्रात स्नान करण्यास गेलेल्या भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये. यासाठी जीवरक्षक पथक नदी पात्रात ठेवली आहेत. (Pandharpur Yatra 2022)

solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
Ashadhi Wari 2022 : भेसळयुक्त १५० किलो पेढा जप्त; मिठाई विक्रेत्यावर गुन्हा दाखल

आषाढीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे. दर्शन रांगेत एक लाखाहून अधिक भाविक आहेत. चंद्रभागा स्नानासाठीही भाविकांची गर्दी झाली आहे. आषाढीचा सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. पंढरी नगरी विठु नामाने दुमदुमू लागली आहे.

solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
Ashadhi Wari 2022 : घरापासून करता येणार पंढरपूरपर्यंत प्रवास; जाणून घ्या एसटीचा उपक्रम

वारक-यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून वारकऱ्यांना श्री विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे. संपूर्ण वारीमार्ग विठ्ठलमय झाला आहे. पालखी आणि दिंडीसोबत पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या मुळगावी सुखरूप पोहंचवण्यासाठी एस टी महामंडळ सज्ज झालं आहे. वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्यभरातील ४ हजार ७०० गाड्यांचे नियोजन केले असून ६ ते १५ जुलै दरम्यान सर्व गाड्यांचे डेस्टिनेशन पंढरपूर असणार आहे. (Ashadhi Ekadashi Wari 2022)

solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
Eknath Shinde : केंद्राच्या पहिल्याच बैठकीत भुमीपुत्रानं घेतला साताऱ्यासाठी महत्वपुर्ण निर्णय

त्याची जय्यत तयारी एसटी महामंडळाकडून पूर्ण झालेली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खडतर काळानंतर तब्बल २० लाख वारकरी पंढरीत येतील अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे. या नऊ दिवसात दोन कोटींचे उत्पन्न जमा करण्याचे उद्दिष्ट एस टी महामंडळाने बाळगले आहे.

सोलापूर आगारातून आषाढी एकादशीसाठी एकूण ६० ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी माहिती दत्तात्रय कुलकर्णी (आगार प्रमुख,सोलापूर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
Satara : साता-यात आपत्ती निवारण कक्ष स्थापन; जाणून घ्या हेल्पलाईन नंबर्स
solapur, pandharpur, ashadhi wari 2022, Pandharpur Wari 2022, Pandharpur Yatra 202, Palkhi 2022, Ashadi Ekadashi
शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com