तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्या चार जणांवर काळाचा घाला ! कैलास चौधरी
महाराष्ट्र

तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्या चार जणांवर काळाचा घाला !

हा अपघात इतका भीषण होता कि, यात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाडीला मागून एका आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

हे देखील पहा -

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावाजवळ आल्यानंतर चाक फुटले. ते बदलण्यासाठी चालकाने वाहन बाजूला घेतले असता, चाक बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या एमएच 20 इजी 1517 या क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली.

यात शरद देवरे, विलास बच्छाव, जगदीश दरेकर, सतीश सूर्यवंशी हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय सावंत, भरत पगार व गोकुळ शेवाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार

पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

Raigad Tourism : तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर 'हे' ठिकाणे अजिबात मिस करू नका

SCROLL FOR NEXT