बुलढाणा - रविवार सायंकाळी नागपूरहुन भुसावळ कडे जाणाऱ्या कंटेनर रेल्वेच्या धडकेत तीन गाईंचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेगांव रेल्वे स्थानकावरच ही घटना घडल्याने अपघाताच्या वेळी स्थानक परिसरात हळहळ व्यक्त होत होती. शेगाव (Shegaon) रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नागपुर (Nagpur) वरून भुसावळकडे (Bhusawal) जाणारी कंटेनर रेल्वे (Railway) ही प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून जात असताना रेल्वेच्या लोको पायलट याला चार गाई रेल्वे रुळावर दिसून आल्या. (Buldhan Latest News)
हे देखील पहा -
यावेळी लोकोपायलटने रेल्वे रुळावरून तिन्ही गाईला बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजविला मात्र अप रेल्वे रुळाच्या एका बाजूला प्लॅटफॉर्म आणि दुसऱ्या बाजूला मालगाडी असल्यामुळे चारही गाई या कंटेनर रेल्वेच्या इंजिनवर आदळल्या त्यामुळे लोको पायलेटने ताबडतोब ब्रेक लावून रेल्वे थांबविली. मात्र तो पर्यंत चारही गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या चारही गाई मालकाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.