nagpur  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : नागपूर हादरलं! भर रस्त्यात शिवसेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

nagpur horrific accident : नागपुरात भर रस्त्यात शिवसेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सहा तरुणांकडून शनिवारी सायंकाळी ६ वाजता अंकूश कडू यांची हत्या करण्यात आली. तरुणांनी रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर धारधार शस्त्राने त्यांच्यावर करत हत्या केली. कडू यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येची घटना घडली आहे. म्हाडा चौकात माजी उप जिल्हाप्रमुख अंकूश कडू यांची हत्या करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून कडू यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. हत्या करणारे ६ तरुण फरार झाले आहेत.

अंकुश कडू यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणांनी कडू यांची हत्या का केली, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर हत्येचं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना वाढताना दिसत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासन अलर्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलीस प्रशासन सतर्क झालंय. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी अचानक शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अकंश कडू यांच्या हत्येची घटना घडल्याने खबबळ उडाल आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस प्रशासनाने या संदर्भात पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT