Samruddhi Mahamarg Accident News, Former Ranji Cricketer Praveen Hingnikar saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा मृत्यू

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

संजय डाफ

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातात नागपूरचे माजी रणजीपटू आणि व्हीसीए आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर (Former Ranji Cricketer Praveen Hingnikar) हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी या जागीच ठार झाल्या. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघात व बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (१८ एप्रिल) झालेल्या भरधाव कार मालवाहू वाहनाला धडकून झालेल्या अपघातात (nagpur) माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर यांना अपघात झाल्यानंतर प्रारंभी मेहकर ग्रामीण रुग्णालय त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या असून ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT