Vinayak Raut saam TV Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Vinayak Raut latest news today : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Namdeo Kumbhar

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Vinayak Raut anticipatory bail update : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनायक राऊत यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावर मुख्य सुनावणी २३ जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत न्यायालयाने राऊत यांना कोणतेही अंतरिम संरक्षण दिलेले नाही.

न्यायालयाने तात्काळ दिलासा नाकारल्यामुळे पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना २३ तारखेच्या आधी कधीही ताब्यात घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती समोर आली.

कोर्टाची नोटीस नेमकी काय?

अर्जदाराच्या वकिलांचा अर्ज अभ्यासला आणि त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. प्रथम माहिती अहवालातील (FIR) आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे अर्जदाराला एकतर्फी अंतरिम संरक्षण (Ex-parte Interim Protection / अटकेपासून तात्पुरता दिलासा) देण्यासारखे कोणतेही ठोस किंवा रास्त कारण दिसत नाही. परिणामी, अंतरिम संरक्षणाची ही मागणी फेटाळण्यात येत आहे. मुख्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी प्रतिवादीला (संबंधित पोलीस ठाणे किंवा तक्रारदार) नोटीस जारी करण्यात यावी. पुढील सुनावणीची तारीख ०६ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

Cholesterol : सुका मेवा हृदयासाठी धोकादायक? 'या' ५ सवयींमुळे वाढू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT