Shivsainik Santosh Parab Attack Case विनायक वंजारे
महाराष्ट्र

Sindhudurg: पोलिसांशी हुज्जत घातल्याचं प्रकरण; निलेश राणेंसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

Shivsainik Santosh Parab Attack Case: पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज, शनिवारी ओरोस जिल्हा न्यायालयात झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Sindhudurg Latest News: पोलिसांशी हुज्जत घातल्याच्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह त्यांच्या पाच जणांनी ओरोस जिल्हा न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. (Nilesh Rane Latest News)

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात डिसेंबर २०२१ ला आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा माजी खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.

यावेळी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज, शनिवारी ओरोस जिल्हा न्यायालयात झाली.

या प्रकरणात निलेश राणे यांच्यासह भाजपचे आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, रुपेश बिडये यांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संतोष परब प्रकरण नेमकं काय?

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 ला जीवघेणा हल्ला झाला होता. तो नितेश राणे यांच्या कार्यकर्त्याने केला होता. त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक 30 डिसेंबरला पार पडणार होती.

याप्रकरणी कणकवली (Kankavli) पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दोन वेळा हजेरी लावली लावली होती. आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी संदेश सावंत यांची कणकवली पोलिसांनी एक तास चौकशी केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT