Aurangabad News : मुलाच्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या मुलाने पैसे घेतल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मुलाने पैसे घेतल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याला बदली करून देतो म्हणून पैसे घेतल्याचा आरोप आहे. पैसे घेऊनही काम करत नसल्याचा संताप त्या ऑडिओ क्लिपमधून दिसून येत आहे. वनविभागात बदली साठी 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, ऋषिकेश खैरे यांनी पैसे घेऊन बदली केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. या आरोपानंतर ऋषिकेश खैरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ते आमचे मित्र आहे.
आमचे व्यवहार सुरूच असतात. महाविकास आघाडीच्या काळात बदली करण्याचा शब्द दिला होता. त्यांचा काम झालं नाही. नंतर क्लिपमध्ये जे आलं, तो मित्रांमधील व्यवहाराचा विषय होता. त्यात बदलीचा विषय नव्हता, असं स्पष्टीकरण ऋषिकेश खैरे यांनी दिलं आहे.
ऑडीओ क्लिपमधील संपूर्ण संभाषण...
ऋषिकेश खैरे: हॅलो
विजय: बोला भाऊ
ऋषिकेश खैरे : कुठे आहे तू...
विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषिकेश खैरे: आ...
विजय: शेंद्राला
ऋषिकेश खैरे : अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले
विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषिकेश खै रे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे...पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषिकेश खैरे : हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषिकेश खैरे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषिकेश खैरे : अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो
ऋषिकेश खैरे : पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषिकेश खैरे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी
ऋषिकेश खैरे : होय
विजय: बरं ठीक आहे चालेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.