Eknath shinde  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; बडा नेता ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार

Eknath shinde News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार आहे. जळगावमधील बडा नेता ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

Vishal Gangurde

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. महायुतीत वाढत्या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीची डोकेदु:खी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु आहे. आता ५०० कार्यकर्त्यांसह माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटातील अनेक बड्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आता राज्यातील बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. शिरीष चौधरी यांनी अमळनेरमधून विधानसभा मतदारसघांतून अपक्ष निवडून आले होते. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

भाजपचे माजी नगरसेवक आणि सरपंच अशा एकूण ४००-५०० कार्यकर्त्यांसह शिवेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

शिरीष चौधरी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरीष चौधरी यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

दुसरीकडे काँग्रेसालही भाजपने मोठा धक्का दिला आहे. विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या डिनर डिप्लोमासीमुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद रोस्टरविरोधातली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

SCROLL FOR NEXT