Highanghat Political News Saam Tv News
महाराष्ट्र

शरद पवार गटाला जोरदार धक्का; माजी आमदाराचा २,२७५ कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश

Highanghat Political News: माजी आमदार राजू तिमांडे यांचा अजित पवार गटात भव्य पक्षप्रवेश. तिमांडे यांच्यासह 2,275 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.

Bhagyashree Kamble

  • हिंगणघाटात माजी आमदार राजू तिमांडे यांचा अजित पवार गटात भव्य पक्षप्रवेश.

  • तिमांडे यांच्यासह 2,275 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.

  • विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर तिमांडे यांचा निर्णय.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला. हिंगणघाट दौऱ्यादरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

राजू तिमांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील माजी आमदार होते. दरम्यान, आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. तिमांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, या पक्षप्रवेश कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.

तिमांडे यांच्यासह २,२७५ कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिमांडे यांचा पक्षप्रवेश महत्वाचा ठरला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. पक्षप्रवेश सोहळ्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत राजू तिमांडे यांना शरद पवार गटाने उमेदवारी नाकारली होती. यानंतर तिमांडे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती. दरम्यान, आज त्यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडली. तसेच अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT