महाराष्ट्र

भाजपमध्ये संशयकल्लोळ : मुरकुटेंची मंत्री गडाखांसोबत हातमिळवणी

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : भाजपने जिल्ह्यात विजयाचे अभियान सुरू केले आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणीचे पुनर्गठण केले जात आहे. नेवासा तालुक्यातही कार्यकारिणी निवडण्यात आली. परंतु या नवीन पदाधिकाऱ्यांमुळे पक्षांतर्गत राजकारण पेटले आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पदाधिकारी निवडीत वर्चस्व राखले आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यासह कार्यकर्त्यांना बाजूला ठेवल्याने धुसफूस सुरू झाली आहे.

भाजपचे माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून मुरकुटे यांच्यावर आरोप केला आहे. तालुका भाजपमध्ये मुरकुटे, लंघे व जुने निष्ठावंत असे तीन गट पडले आहे. तिसऱ्या गटाने लंघे यांची पाठराखण केली आहे. मुरकुटे यांना पक्षांतर्गत विरोधक वाढल्याचेच हे उदाहरण आहे.

जिरे म्हणाले, " तालुक्यात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांचे पंख छाटण्याचे काम यापूर्वी झाले. आताही मुरकुटे यांनी राजकारण केले. स्वार्थी वृत्तीमुळेच त्यांचा विधानसभेला मोठा पराभव झाला. त्यातून धडा घेऊन ते काही तरी शिकतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु भेंडा गटातील आपली जिल्हा परिषदची जागा कशी सुरक्षित राहील व भविष्यात आपल्याला कुणीही स्पर्धक असू नये, यासाठी माजी आमदार काम करीत आहेत. जनमाणसात स्थान असलेल्या लंघे यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा तसेच तालुका कार्यकरणीवर स्थान मिळू नये, यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले.

वास्तविक लंघे यांनी विधानसभेला भाजपसाठी प्रामाणिक प्रयत्न करून शिरसगाव गणात आघाडी मिळून दिली होती. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे राजकारण फक्त आपल्या स्वार्थासाठी चालू आहे. त्यांनी विरोधकांसोबत अंधारात युती केलीय. भाजपचे नितीन दिनकर, सचिन देसरडा यांनी विधानसभेला जीवाचे रान करून माजी आमदारांना निवडून आणण्यासाठी तालुका पिंजून काढला. आताही या दोघांसह अनेक निष्ठावान कार्यकर्ते भाजपचे मनापासून काम करत आहे. नेवासे भाजपमध्ये जो एककलमी कार्यक्रम चालू आहे. हे टाळण्यासाठी लंघे किंवा देसरडा यांच्याकडे तालुक्याचे सूत्र दिले पाहिजे, असेही जिरे म्हणतात.

पक्षाला घातक

नेवासे तालुक्यात तिसरा नेता उदयास येऊ नये याची दोन्ही नेते खबरदारी घेतात. आजी-माजी आमदार यांची अंधारात युती झाली आहे. तालुक्यातील जनता तिसऱ्या नेत्याची वाट पाहत आहे. आजही नेवासे भाजपमधील काही युवक निष्ठावान नेते तालुक्याला पर्याय देऊ शकतात. परंतु माजी आमदार यांनी भाजप संपविण्याचा पण केला की काय अशी शंका निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीसांविरोधात रचला होता मोठा कट, मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT