Ladki Bahin Yojana  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार? माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana update : आधी 8 लाख लाडक्या बहीणींच्या हप्त्याला कात्री लावली.. या लाडक्यांना अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत...मात्र सरकार हळुहळू लाडकी बहीण योजनाच बंद करेल, अशी चर्चा रंगलीय.. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरु असतानाच लाडकी बहिण योजना कशी बंद होणार यावर चर्चा रंगलीये.. एकीकडे राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात होणार असल्याची माहिती समोर आली असतानाच दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी ही योजना बंद करणार असल्याचा दावा केलाय. नाशिकच्या निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंनी हा दावा केला.

एकीकडे आदित्य ठाकरेंच्या दाव्यानं पुन्हा लाडकीच्या पैशांवर गंडातर येणार का असा सवाल उपस्थित होतोय..त्यातच सरकारनं अजुनही लाडकीला 2100 रुपये दिलेले नाहीत..अर्थविभागावर लाडकीचा आर्थिक भार आहेच..मात्र तरीही अर्थमंत्री अजित पवार वारंवार योजना बंद होणार नसल्याचा दावा करतात...

असं असलं तरी या ना त्या कारणानं सरकार शक्य तितक्या लाडकींच्या हप्त्यात कपात करताना दिसतंय. किंवा निकषात बदल करुन लाडकीला योजनेतून वगळण्यात तरी येतंय... त्यामुळे आदित्य ठाकरेंनी केलेला दावा फोल ठरणार की सरकार खरंच टप्प्याटप्प्यानी ही योजना बंद करणार हेच पाहायचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT