NCP/BJP Saam TV
महाराष्ट्र

भाजपला धक्का; पुणे ZPचे माजी सदस्य, हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मंगेश कचरे

बारामती : तीन एप्रिलला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे श्रीमंत ढोले (Srimant Dhole) हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. 3 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत श्रीमंत ढोले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

इंदापूर (Indapur) तालुक्यातील श्रीमंत ढोले यांचे वर्चस्व असून ढोले हे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून श्रीमंत ढोले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याआधी हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 3 एप्रिलला भाजपचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा दत्तात्रय भरणे यांनी केलाय. हाजाहीर प्रवेशाचा कार्यक्रम 3 तारखेला लाखेवाडीत पार पडणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

Vande Bharat Train : छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स; शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागोंकाची १०० कोटीची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT