Rajesh Tope, Coronavirus, coivd-19, corona, jalna
Rajesh Tope, Coronavirus, coivd-19, corona, jalna saam tv
महाराष्ट्र

Corona चा धाेका वाढला आहे, सरकार काय करतेय, गांभीर्याने घ्या ! माजी आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी सूचविले उपाय

लक्ष्मण सोळुंके

Rajesh Tope News : सरकार कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचा गंभीर आराेप माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope criticizes maharashtra government) यांनी जालना (jalna) येथे केला आहे. सरकार आणि टास्क फोर्समध्ये कुठला ही समन्वय असल्याचं दिसून येत नाही असेही टोपेंनी नमूद केले. (Maharashtra News)

टाेपे म्हणाले गेल्या दोनशे दिवसात राज्यामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे देशाचे केंद्रीय मंत्री यांनी घेतलेला आढावा बैठकीमध्ये रिव्ह्यूज आणि माॅक ड्रिल बाबत महत्वाचा सूचना केलेल्या आहेत.

वाढती रुग्ण संख्या पाहता राज्यात स्थानिक पातळीवर बेड पासून ते ऑक्सीजन बेड पर्यन्त सुविधा निर्माण करण्याची तयारी असायला हवी हाेती. त्याचं बरोबर अशा परिस्थितीत वाढती रुग्ण संख्या पाहता डॉक्टर्स यांना प्रशिक्षण देणे महत्वाचे हाेते. या कुठल्याच प्रकारची तयारी राज्यात सुरू असल्याचे दिसत नाही.

त्याच बरोबर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाधीत रुग्णांना आयसोलेट करणं महत्वाचं आहे. मात्र तसल्या कुठल्याच सुविधा तयार होत नसल्याने ही गंभीर बाब असल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे.

राज्य सरकार आणि टास्क फोर्समध्ये कुठला ही समन्वय असल्याचं दिसून येत नसल्याचा ही गंभीर आरोप यावेळी टोपे यांनी केला. सरकार कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोनाला गंभीरतेने घेत नसल्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT