Eknath Shinde, Parbhani Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News : परभणीतील 101 सरपंच, 34 माजी नगरसेवक, शेकडाे कार्यकर्त्यांच्या हाती धनुष्यबाण; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

यामुळे मुख्यमंंत्र्यांच्या गटाचे राजकीय बळ वाढू लागले आहे.

राजेश काटकर

Shiv Sena Parbhani : परभणी (parbhani latest news) जिल्ह्यात विविध पक्षातील पडझड थांबता थांबेना असे चित्र आहे. या जिल्ह्यातील विविध पक्षातील शेकडाे कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (eknath shinde) साथ देण्यास प्रारंभ केला आहे. शेकडाे कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील (shivsena) प्रवेशामुळे आगामी काळात येथील स्थानिक निवडणुकांमध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. (Maharashtra News)

परभणीचे शिवसेना युवा नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी विविध पक्षातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंच , 34 माजी नगरसेवक, शेकडो महिला, पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य जलील पटेल यांचा देखील समावेश आहे आहे. परभणी जिल्ह्यातुन आतापर्यंत 201 सरपंच, 64 नगरसेवकानीं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात होणा-या सर्व निवडणूकीत रंगत पाहायला मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT