Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

मी आज मुख्यमंत्री नसलो, तरी...; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ओबीसींच्या आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.

रामनाथ दवणे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (mva government) नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पेरिकल डेटा व ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याने ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून ओबीसी समाजाला (obc reservation) त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय मैदानात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनीही ओबीसींच्या आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो. मी आज मुख्यमंत्री नसलो, तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती, त्याला यश मिळालं, यासारखे समाधान नाही, असं ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. हा तिढा अवघड होता पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी,वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या टीमने हे शिवधनुष्य पेलले,त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले.

खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो,तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती,त्यामुळे यश मिळालं. यासारखे समाधान नाही, असंही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT