Saam tv Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Arrest : नाशिक पोलिसांनी माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक केली. पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नाशिक पोलिसांकडून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला राहुल धोत्रे हत्याप्रकरणी अटक

बैल पोळा सणाच्या दिवशी झालेल्या हाणामारीत धोत्रे गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

निमसे अटक टाळण्यासाठी विविध राज्यांमध्ये २० दिवस फिरत होता

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक पोलिसांनी भाजप नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांनी भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक केली आहे. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या हत्याकांड प्रकरणी निमसेह त्याच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आज सोमवारी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली.

बैल पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूरनाका परिसरात माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि धोत्रे गटात जोरदार हाणामारी झाली. यात निमसे गटाने केलेल्या गंभीर मारहाणीत राहुल धोत्रेचा 29 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणानंतर त्याच्यावर आडगाव नाका पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हत्याकांडानंतर निमसे नाशिकमधून फरार झाला होता. निमसे पोलिसांना घाबरून गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक राज्यात प्रवास करत होता. फरार झाल्याने निमसेने पर्यटनस्थळ आणि देवस्थान फक्त अशा ठिकाणी प्रवास केला. त्याने कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम केला नाही. त्यानंतर निमसे स्वत:हून नाशिकला हजर झाला.

निमसे याच्या ड्रायव्हरने गुजरात एअरपोर्ट सोडल्याची माहिती दिली होती. ट्रॅव्हल बसनेच निमसे याने २० दिवस प्रवास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. निमसेच्या मागावर ४ पोलीस पथके होती. नाशिक पोलिसांच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

Gold- Silver Price: सोन्याला पुन्हा चकाकी! १० तोळे १२००० रुपयांनी महागले; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

SCROLL FOR NEXT