राज्यमंत्री भरणेंना मास्कचा विसर; कॅमेरे पाहताच मागवला 'मास्क'  मंगेश कचरे
महाराष्ट्र

राज्यमंत्री भरणेंना मास्कचा विसर; कॅमेरे पाहताच मागवला 'मास्क'

मंगेश कचरे

बारामती: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) हे कोरोनाचे (Coronavirus) नियम मोडण्यात आघाडीवर आहेत. दत्तात्रय भरणे हे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात मात्र ते मास्क कधीही लावत नाहीत. जरी मास्क असला तरी तो फक्त अडकवलेला असतो काल कृषी विभागाच्या कार्यक्रमात तर भरणे हे मास्क न लावता कार्यक्रमात आले. त्यानंतर शेती अवजारांची पाहणी करीत असताना सोशल डिस्टन्स (Social Distancing) नसताना भरणे हे मास्क न घालताच इतरांशी बोलत होते.

भरणे यांचे लक्ष अचानक वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍याकडे गेल्यानंतर त्यांनी स्वीय सहाय्यकाला हाक मारून गाडीतून मास्क आणण्यास सांगितला आणि त्यांनी मास्क घातला मात्र असे असले तरी भरणे मास्क न वापरण्यात आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचेच मंत्री मास्क न घालता फिरतात मात्र काल बारामतीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विना मास्क असलेल्या एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनची चांगली शाळा घेतली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वतः कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करतात आणि मास्क वापरतात आणि इतरांनाही कोरोनाचे नियम पाळण्याच्या आणि मास्क वापरण्याच्या सूचना करतात. मात्र त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे कोरोनाचे नियम धुडकावत लावून विना मास्क कार्यक्रमांना हजेरी लावतात अशा विना मास्क मंत्र्यांची शाळा उपमुख्यमंत्री अजित पवार कधी घेणार ?

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, शिंदे गट, अजिदादांना किती जागा मिळणार?

Maruti Brezza Car: एक नंबर! फक्त २ लाख रुपयात घरी आणा Maruti Brezza कार

Maharashra Rain Alert : परतीचा पाऊस पुन्हा महाराष्ट्राला झोडपणार, आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Rashi Bhavishya : भाग्यकारक घटना घडतील, यश दारात येईल; या राशींसाठी बुधवार सोन्यासारखा, वाचा राशीभविष्य

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे आज फळफळणार नशीब, तुमची रास?

SCROLL FOR NEXT