Forest Workers Agitaion In Satara Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai: वनमजुरांना सेवेत कायम करा; आजपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदाेलन

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्र राज्य वनमजुर, वन कामगार,वनपाल आणि जनरल युनियन यांच्या वतीने वनमजुरांना शासन सेवेत रुजू करावे या मागणीसाठी आजपासून मुंबईतील (mumbai) आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा मजुरांनी सातारा (satara) येथे दिला.

सातारा (satara), सांगली (sangli) आणि नागपूर (nagpur) जिल्हा वन विभागातील वन मजुरांना शासन सेवेत कायम करण्याबाबत युनियनने मंत्रालयात सादर केलेली वन मजुरांची यादी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी आणि शासन सेवेत रुजू करावे या मागणीसाठी सातारा वन विभागाच्या कार्यालयासमोर वन मजुरांनी (forest workers) कुटुंबासमवेत निदर्शने केली.

यावेळी वनमजुरांना शासन सेवेत रुजू करावे या मागणीसाठी आजपासून आझाद मैदानावर धडकणार असल्याचे कर्मचा-यांनी नमूद केले. हे आंदाेलन बेमुदत असेल असेही आंदाेलकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT