Pandharpur, Pandharpur Maghi Yatra saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : पंढरपुर विषबाधा प्रकरण; किराणा दुकानावर फूड अँड ड्रगचा छापा; 55 हजारांचा माल जप्त

रात्री दाेन वाजता भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारत नागणे

Pandharpur Maghi Yatra News : पंढरपुरात (Pandharpur) माघी वारी यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली. हे सर्व भाविक (devotees) नांदेड जिल्ह्यातील आहेत. सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी (doctor) सांगितले आहे. दरम्यान ज्या दुकानातून भाविकांना माल खरेदी केला हाेता. तेथे जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भगर आणि खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे.

विठुरायाच्या (vitthal) दर्शनासाठी आलेल्या नांदेड जिल्ह्यातील भाविकांनी शहरातील स्टेशन रोडवरील एका दुकानातून माल खरेदी केला हाेता. अन्न व औषध प्रशासनाने आज (गुरुवार) या दुकानाची तपासणी केली. तपासणी दरम्यान दुकानातील आठ हजार 850 रूपये किंमतीची 118 किलो भगर आणि 23 हजार 370 रूपये किंमतीचे 123 लिटर खाद्य तेल असा एकूण 32 हजार 220 रुपये किंमतीचा साठा पथकाने जप्त केला‌.

संबंधित दुकानातील भगर आणि खाद्य तेलाचे नमुने घेतले आहेत. ते पुणे येथील‌ प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे अन्न व औषध विभागाचे उपायुक्त सुनील जिंतूरकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. दरम्यान सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 : अजय-मृणालची जोडी सुपरहिट, दुसऱ्या दिवशी सिद्धांतच्या चित्रपटानं कमावले फक्त 'इतके' कोटी

Vande Bharat Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? वाचा रेल्वेचे नेमके नियम काय

Friendship Meaning: मैत्रीचा खरा अर्थ काय?

Mohammed Siraj: सिराजने रचला सापळा आणि क्रॉली अडकला! इंग्लंडला धक्का देण्यासाठी मियां मॅजिक, वाचा कशी आखली रणनिती

Offline Location: इंटरनेट नसेल तरी तुमचे लोकेशन शेअर करु शकता, जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

SCROLL FOR NEXT